घडवतो भविष्याचे
चॅम्पियन्स
विजेता होण्यासाठी आशा, त्याग, संघर्ष आणि जिद्द महत्वाची आहे. आम्ही यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो आणि उद्याचे विजेता घडवतो.
आमच्या बद्दल
सामान्य कुटुंबातील एखाद्या युवकाला/युवतीला कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर आर्थिक पाठबळ असणं फार गरजेचं असतं. अनेकदा आर्थिक पाठबळ लाभत नाहीत म्हणून विद्यार्थी आवड असलेलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे वळतात.
गुणवत्ता आहे, शिकण्याची जिद्द आहे आणि मेहनत करण्याची धडपड आहे. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यात सोडावे लागते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करून विद्यार्थ्यांने चांगली पदवी मिळावी, या हेतूने शील फाऊंडेशन अशा विद्यार्थ्यांना योग्य शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे कार्य करणार आहे.
अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी शील फाऊंडेशन देणार आहे. शील फाऊंडेशन भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंना आर्थिक पाठबळ आणि सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे.
गुणवत्ता असलेल्या एखाद्या खेळाडूला आर्थिक पाठबळ अपुरं पडतयं तसेच योग्य मार्गदर्शन लाभत नाहीय, अशा सर्व खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य करण्याचा वीडा शील फाऊंडेशनने हाती घेतला आहे.
उद्दिष्ट
वैयक्तिक, क्रीडा, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बदल घडवायचा आहे. कोणतीही कला दुर्लक्षित राहु नये, हेच आमचे ध्येय आहे.
दृष्टी
जागतिक पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवून देशाचे नाव उंच करणाऱ्या युवकांचे संगोपन करून प्रोत्साहन करण्याचे कार्य शील फाउंडेशन करत राहिल. येणाऱ्या काळात आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गुणवंतापर्यंत पोहचून त्याला प्रशिक्षण देण्याची दृष्टी ठेवतो.
Talent

अजित यादव

विनय कुमार

अभिषेक जोशी
भारतीय सैन्य

सीमेवर दिवस रात्र तैनात असलेल्या सैन्यामुळे आपण आनंदाने जगू शकतो. जगभरातून आलेल्या विविध संकटांना ढाल बनून सैनिक मात देतात. नैसर्गिक असो वा मानवी आपत्ती वेळोवेळी प्रत्येक आपत्तीला सामान्य नागरिकांच्या मदतीला सैनिक धावून येतात.
पुलवामा हल्ला, मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अशा कित्येक हल्ल्यांमध्ये अनेक जवानांना वीरमरण प्राप्त झालेत. आजपर्यंत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी प्राणाची आहुती जवान या देशासाठी देतात.
भारतात तीन प्रकारचं सैन्य आहेत. भारतीय भूसेना, नौसेना आणि वायुसेना असे तीन प्रकार आहेत. याच्या व्यतिरिक्त पौलिस देखील आपल्या सुरक्षेसाठी चोवीस तास हजर असतात. भारतात विविध गोष्टींमुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या सोयी-सुविधा त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत आणि वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत.
एक जवाबदार संस्था म्हणून शील फाऊंडेशन भारतीय सैन्यात वीरमरण पावलेल्या कुटुंबातील बालकांना स्थैर्य देण्याचं कार्य करते. सैन्यात कुटुंबाचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तसेच त्यांना सैन्यात सहभागी व्हायचं असेल, तर शील फाऊंडेशन आर्थिक पाठबळ देणार आहे.