आमच्या बद्दल
सामान्य कुटुंबातील एखाद्या युवकाला/युवतीला कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर आर्थिक पाठबळ असणं फार गरजेचं असतं. अनेकदा आर्थिक पाठबळ लाभत नाहीत म्हणून विद्यार्थी आवड असलेलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे वळतात.
गुणवत्ता आहे, शिकण्याची जिद्द आहे आणि मेहनत करण्याची धडपड आहे. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यात सोडावे लागते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करून विद्यार्थ्यांने चांगली पदवी मिळावी, या हेतूने शील फाऊंडेशन अशा विद्यार्थ्यांना योग्य शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे कार्य करणार आहे.
अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी शील फाऊंडेशन देणार आहे. शील फाऊंडेशन भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंना आर्थिक पाठबळ आणि सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे.
गुणवत्ता असलेल्या एखाद्या खेळाडूला आर्थिक पाठबळ अपुरं पडतयं तसेच योग्य मार्गदर्शन लाभत नाहीय, अशा सर्व खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य करण्याचा वीडा शील फाऊंडेशनने हाती घेतला आहे.
अनेकदा खेळाडू समोर कौटुंबिक समस्या, संबंधित क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्ती, उपयुक्त साधन सामग्रीचा तुटवडा या अडचणींमुळे खेळाडू खचून जातो. विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यात या सगळ्या अडचणी अडथळा निर्माण करत असतात. या सर्व अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांना योग्य तो मार्ग दाखवणे आणि त्यांना मदतीचा हात देण्याचं कार्य शील फाऊंडेशन करत आहे.
या सर्व खेळाडूंना एकत्र करून त्यांना क्रीडा क्षेत्रातील योग्य शिक्षण/ मार्गदर्शन देणे. योग्य मार्गदर्शक/ प्रशिक्षकाकडून त्यांचं प्रशिक्षण करून घेणे. क्रीडा क्षेत्रातील विविध नवीन गोष्टींची यांची ओळख करून देणे ह्याच्यावर प्रामुख्याने आमचा भर असेल.
उद्याच्या उज्वल भविष्यसाठी मदतीचा हात देऊया,
नवीन भारताचे खेळाडू घडवुया!!