भारतीय सैन्य
सीमेवर दिवस रात्र तैनात असलेल्या सैन्यामुळे आपण आनंदाने जगू शकतो. जगभरातून आलेल्या विविध संकटांना ढाल बनून सैनिक मात देतात. नैसर्गिक असो वा मानवी आपत्ती वेळोवेळी प्रत्येक आपत्तीला सामान्य नागरिकांच्या मदतीला सैनिक धावून येतात.
पुलवामा हल्ला, मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अशा कित्येक हल्ल्यांमध्ये अनेक जवानांना वीरमरण प्राप्त झालेत. आजपर्यंत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी प्राणाची आहुती जवान या देशासाठी देतात.
भारतात तीन प्रकारचं सैन्य आहेत. भारतीय भूसेना, नौसेना आणि वायुसेना असे तीन प्रकार आहेत. याच्या व्यतिरिक्त पौलिस देखील आपल्या सुरक्षेसाठी चोवीस तास हजर असतात. भारतात विविध गोष्टींमुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या सोयी-सुविधा त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत आणि वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत.
एक जवाबदार संस्था म्हणून शील फाऊंडेशन भारतीय सैन्यात वीरमरण पावलेल्या कुटुंबातील बालकांना स्थैर्य देण्याचं कार्य करते. सैन्यात कुटुंबाचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तसेच त्यांना सैन्यात सहभागी व्हायचं असेल, तर शील फाऊंडेशन आर्थिक पाठबळ देणार आहे.
अनेकदा सैन्य भरती परिक्षा देणाऱ्या युवकांना/ युवतींना योग्य मार्गदर्शन लाभत नाही, पैशांची देखील कमी भासते. अशा सर्व युवकांना/ युवतींना आम्ही आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शनाद्वारे त्यांना इच्छुक क्षेत्रात करियर घडवण्यासाठी मदत करणार आहोत.
आपली सुरक्षा करणाऱ्या या योद्धांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या बालकांना उज्वल भविष्य घडवण्यासाठी शील फाऊंडेशन मदत करणार आहे. आमचं छोटसं सहाय्य अनेक कुटुबांना तसेच अनेक युवकांवा नवीन दिशा देण्याचं कार्य करत राहिल.